...

1 views

भारतरत्न
निपजुनी पुत्ररत्न महू गावी
होऊनी उद्धारक दिनदलितांचा...
वाढले रामाजी अन् भिमाबाईंच्या संगोपनात
बाबासाहेब म्हणून आले ओळखण्यात

जाती जमातींना ओलांडून ते आले
नांदीले संबंध रमाबाईंशी...
झाले भीमाचे ते भीमराव
अन् रमाबाईंचे पती...

घडविल्या गेले थोर शिल्पकारा हाती
जसे रामजी व मा भीमाबाई
उदंड ममतेने न्हाऊन निधाले
कौतुकाने प्रोक्त झाले

श्वेत वस्त्र धारण केले
अमोध सम्यम दर्शविले
अजान होते वय
दीन दलितांच रक्षण होत ध्येय

झाले ते कायद्याचे मंत्री
कधी स्त्री उद्धारक तर कधी साहित्यिक
चक्र होऊनी अस्पृश्यांच्या हक्काच्या रथाचे
समानतेच्या सदभावनेचे प्रतिबिंब केले खडे

कोणास वाटे होते ते प्रज्ञा सूर्य..
कोणास वाटे जैसे स्त्रीउद्धारक, अर्थतज्ञ..
भाग्य या भारत देशाचं,
लाभले ऐसे भारतरत्न..

केले त्यांनी अनेक निवाडे
कधी स्वकीयांचे तर कधी परकीयांचे
कर्तव्यपाई सोडले पाणी नात्यांवर
वाटे याचा न्यायासनासही गर्व

मूर्ती होते धर्मनिष्ठ पदाचे
कीर्ती होते प्रकांड विद्वानाची
दिले मायेचे आश्रय अनेकांसि
प्रकाशुन उठले होऊनी प्रेरणामूर्ती

दलीत झाले त्रस्त अवकाळी
काळ,क्षण सर्वत्र विखुरले
निरव अंधकार भीमरावांच्या मनास पडले
दुःखाचे विघ्नहर्ता अवतरले

हक्काच्या कार्याला समाजाचा वेढा
भीमरावांनी वेडीला
पराक्रमाचा मोडा शत्रूंना दिला
चकवा साधला शिवरायांचा गनिमीकावा..

2 वर्षे 11महिने 18दिवसांच्या संघर्षानंतर
लिहले संविधान या देशाचे व्यवस्थित
राखले हक्क सर्वसामान्यांचे,दीन दलितांचे,
ठेवले स्वतंत्र अधिकार अबाधित

रचला इतिहास भारताचा
कायद्यांचा आणि हक्कांचा..
लिहली राज्यघटना या देशाची
घडविला ग्रंथ संविधानाचा..

कित्येक वर्षे दलीत होते कैदेत व्यथीत
सोडवले त्यांना व राखले अबाधित
निष्ठेचे अंकुर गगनचुंबीले
बाबासाहेब म्हणुनी अवतरले

गाठली त्यांनी मशालीची परिसीमा
वंदितो कृपाळा तुम्हां चरणी
न भुता नः भविष्यती
भारताचे प्रतिनिधी..

वृत्ती होती कणखर होती
त्यांची कृती असीम होती
त्यागाची धनी होते
पुष्कळ भीमराव शोभे
जैसे भारतरत्न भारताचे...

-- दर्शन बोंबटकार
© All Rights Reserved