...

3 views

मुलगी
मुलगी


मुलगी केवळ त्याग नव्हे
राग तर नव्हेच नव्हे
तो असा भाग आहे
जिच्याविना सृष्टी अभाग आहे

ते उवाच
हे उवाच
जननिविना नाही आमची खेर
धूर्त सम सगळ्यांची नेर
भोगापलीकडे गेला नाही
अजूनही आमला घेर

वरून काळा असणे
यांत आपला काय दोष
आतून गोरा नसणे
याचा खरा आहे सोस

ती हवी असते
सणाला
धनाला
मनाला
प्रत्येक क्षणाला
पण ती नसते
मोबदल्याच्या कोणत्याच कणाला

ती आहे अथांग सागर
प्रेमाने भरते आपली घागर
सहनशीलता जणू तिचं रक्तच......

आई बापाच्या
भाऊ बहिणीच्या
हृदयाचं असते ती स्पंदन
नवरा असतो तिला
कायम वंदन
झिजते जणू चंदनाचं कोंदण

तिची महती वर्णावी
त्यास उनी पडते
माझ्या शब्दसमर्थ्याची चादर
आतातरी या जोखळदंडातून
मुक्त होईल का तिचा
पितृसत्तेच्या दावणीला
बांधलेला पदर..?