...

3 views

मायबापाची थोरवी
मायेनं जपलं आई तू
बाबांनी स्वतः च सपानही बाजूला सारलं,
तळपत्या उन्हात सार
आयुष्य तुम्ही पणाला लावलं,
न दिस पाहिला न रात पाहिली,
तुमच्या लेकरासाठी जमीनही गहाण ठेवली,
जिण तुमचं सार तुमच्या लेकरासाठी आहे,
आशीर्वाद असतो तुमचा पाठीशी
त्यामुळे त्या लेकरासाठी सगळ शक्य आहे,
मायबापाचं जगणं
फक्त त्या लेकरासाठी असत,
आयुष्यातला प्रत्येक आनंद
ते लेकरूच असत,
जगतात फक्त त्याच्यासाठी
त्याच्यासाठीच रात्रीचा दिवस करतात,
भूक तहान विसरून फक्त
दिवसरात्र कष्ट करतात,
अंथरुणावर असूनही
लेकरांच्या भविष्याचा विचार करतात,
डोळे झाकले असले तरी
फक्त नी फक्त त्यांचाच विचार करतात,
काही कमी नको पडायला आपल्या लेकराला
असाच सतत विचार करतात,
आई बाबा असतात ना हे
हे फक्त आपल्या लेकराचाच विचार करतात,
ठेच लागता लेकराला माय
नवी साडी असेल तरीही त्याचा तुकडा फाडते,
लेकरापेक्षा ती साडी काहीच नाही अस समजून
त्याच्या जखमेवर ती तिच्या साडीचा तुकडा बांधते,
ध्येय मोठे लेकराचे
त्यासाठी बाप रात्रीचा दिस करतो,
स्वतः ची झोप हरवून
फक्त त्याच्या लेकराचाच विचार करतो,
मायबापाची हीच मेहनत
लेकराला मोठे ध्येय मिळवून देते,
मायबापाच्या कष्टाला
एक नवीन यश मिळवून देते,
कोटी कोटी प्रणाम
त्यांच्या त्यागाला,
थोरवी शतदा गाते मी मायबापाची
सलाम त्यांच्या प्रत्येक कार्याला....

-sandhya
© All Rights Reserved